मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीबाबतची कार्यपध्दती

आरोग्यासाठीच्या शासकीय योजनांचा सुयोग्य वापर होण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये अर्ज करण्यापूर्वी खालील प्रमाणे प्राथम्याने कार्यवाही करावी.

1) महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजना. (मोफत उपचार):- या योजनेच्या आपल्या जिल्हयाच्या समन्वयकास फोन करुन पेशंटला नामतालिकेवरील (Empaneled) दवाखान्यात (www.jeevandayee.gov.in) सोबतजिल्हा समजपकांचे नाव व संपर्कक्रमांकाची यादी. अॅडमिट करावे.

2) चॅरिटी हॉस्पीटल (मोफत / सवलतीच्या दरात):- जिल्हयातील चॅरिटी हॉस्पीटलमधील उपलब्ध बेडबाबत माहिती चॅरिटी इन्स्पेक्टर/ त्यांचे कार्यालयातून घेवून त्यानुसार रुग्णास चॅरिटी बेड उपलब्ध असलेल्या दवाखान्यात अॅडमिट करावे. (www.charity.maharashtra.gov.in)

3) राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम (RBSK) (मोफत उपचार)- ०-१८ वर्षे वयापर्यंतच्या पेशंटसाठी या योजनेअंतर्गत मोफत उपचार केले जातात. आपल्या जिल्हयाच्या समन्वयकास फोन करून योजनेतील दवाखान्यात अॅडमिट करावे. (www.rbsk.gov.in)

4) मुख्यमंत्री सहाय्यता निधी- 1) हृदयदरोग २) मेंदूरोग, 3) नवजात बालके 4) मूत्रपिंड प्रत्यारोपण प्रत्यारोपण, 5) यकृत प्रत्यारोपण, 6) कर्करोग, 7) अपघात, 8) डायलिसिस, 9) हृदयप्रत्यारोपण, 10) CVA व 11) Bone Marrow Transplant या 11 गंभीर आजारांसाठी उपरोक्त तीनही योजनांचा लाभ मिळू न शकणाऱ्या आणि राज्यातील या योजनेत नोंदणीकृत रुग्णालयात उपचार घेणाऱ्या पात्र रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून वैद्यकिय समितीमार्फत तपासून अर्थसहाय्य दिले जाते. संपर्क क्र. 022-22026948 सविस्तर माहिती व रुग्णालयाची यादी वेबसाईटवर आहे (cmrf.maharashtra.gov.in)

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, धर्मादाय रुग्णालये यामध्ये लाभार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा व मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये या प्रयोजनार्थ उपलब्ध सिमित निधीचा ययोचित वापर व्हावा म्हणून उपरोक्त योजनांचा लाभ मिळू न शकणान्या रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून लाभ देण्यात येतो.

 > रुग्णालयातून डिस्चार्ज झाल्यानंतर त्या प्रकरणांची शहानिशा करणे शक्य नसल्यामुळे अशा रुग्णांना अर्थसहाय्य देय नाही.

> राज्याबाहेरील रुग्णालयांवर महाराष्ट्र शासनाचे यंत्रणांचे नियंत्रण नसते. तसेच त्यांचेकडून उपयोगिता प्रमाणपत्र घेणे शक्य होत नसल्यामुळे राज्याबाहेरील रुग्णांलयाना अर्थसहाय्य प्रदान करण्यास प्रतिबंध करण्यात आलेले आहे.
> महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना यांचेकडील समितीच्या शिफारशीनुसार व त्यांनी अर्थसहाय्याची शिफारस केल्यास त्या रक्कमेच्या ५०% इतकी रक्कम प्रदान करण्यांत येत आहे.

> अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडावी. • Email id – aao.cmrf-mh@gov.in

  1. अर्ज (विहीत नमुन्यात)
  2. वैद्यकिय खर्चाचे अंदाजपत्रक / प्रमाणपत्र मुळप्रत डॉक्टरांच्या सही व शिक्यासह खाजगी रुग्णालय असल्यास सिव्हील सर्जन यांचेकडून प्रमाणित करणे आवश्यक आहे.)
  3. तहसिलदार कार्यालयाचा उत्पन्नाचा दाखला (रु. 1.60लाख पेक्षा कमी असणे आवश्यक आहे.)
  4. रुग्णाचे आधारकार्ड (महाराष्ट्र राज्याचे)
  5. रुग्णाचे रेशनकार्ड (महाराष्ट्र राज्याचे)
  6. संबंधीत आजाराचे रिपोर्ट असणे आवश्यक आहे.
  7. रुग्णालयाची नोंद मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयाच्या संगणक प्रणालीवर असल्याची खात्री करावी.
  8. अपघात असल्यास, FIR किंवा MLC असणे आवश्यक आहे.
  9. अवयव प्रत्यारोपण असल्यास रुग्णालयाचे मान्यता प्रमाणपत्र अथवा ZTCC येथे नोंदणी केल्याची पावती जोडणे आवश्यक आहे.

अर्थसहाय्याची मागणी ई मेल व्दारे केल्यास अर्जासह सर्व कागदपत्रे PDF स्वरुपात (वाचनीय) पाठवून त्याच्या मुळ प्रती मुख्यमंत्री सहाय्यता निधी कडे टपालाव्दारे तात्काळ पाठविण्यात यावेत.1) हृदययरोग, २) मेंदूरोग, 3) नवजात बालके, 4) मूत्रपिंड प्रत्यारोपण, 5) यकृत प्रत्यारोपण, 6) कर्करोग, 7) अपघात, 8) डायलिसिस, 9) हृदयप्रत्यारोपण, 10) CVA व 11) Bone Marrow. Transplant या 11 गंभीर आजारांसाठी

mahacmmrf.com © 2022 All rights reserved

Design By ORNET Technologies Pvt. Ltd.

Skip to content