महाराष्ट्र शासन - मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी Online अर्ज भरण्यासाठी महत्वपूर्ण सूचना

  1. डिस्चार्ज झालेल्या/उपचार पूर्ण झालेल्या खर्चाची प्रतिपूर्ती म्हणून अर्थसहाय्य दिले जाणार नाही याची नोंद घ्यावी. तसेच अर्ज करण्यापूर्वी खालील शासकीय योजनांसाठी पात्र असल्यास लाभ घ्यावा.
  2.  रुग्ण महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना / आयुष्यामान भारत / राष्ट्रीय बालक स्वास्थ्य कार्यक्रम/ धर्मदाय रुग्णालय इत्यादी कोणत्याही एका योजनेत लाभार्थी असल्यास अर्ज स्विकारण्यात येणार नाही.
  3. अर्जात दर्शविलेली माहितीशी संबंधित कागदपत्रे/ प्रमाणपत्रे अर्जदाराने स्व साक्षांकित (Self Attest) करून सोबत जोडणे अनिवार्य आहे.
  4. संशयास्पद अथवा खोटी/बनावट माहिती दिलेली आढळल्यास तो अर्ज रद्द करण्यात येईल तसेच कायदेशीर कार्यवाहीस पात्र ठरेल.

अर्जासोबत खालील पैकी आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक
  1. वैद्यकिय खर्चाचे अंदाजपत्रक / प्रमाणपत्र मुळप्रत डॉक्टरांच्या सही व शिक्यासह खाजगी रुग्णालय असल्यास सिव्हील सर्जन यांचेकडून प्रमाणित करणे आवश्यक आहे.)
  2. तहसिलदार कार्यालयाचा उत्पन्नाचा दाखला (रु. 1.60लाख पेक्षा कमी असणे आवश्यक आहे.)
  3. रुग्णाचे आधारकार्ड (महाराष्ट्र राज्याचे)
  4. रुग्णाचे रेशनकार्ड (महाराष्ट्र राज्याचे)
  5. संबंधीत आजाराचे रिपोर्ट असणे आवश्यक आहे.
  6. रुग्णालयाची नोंद मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयाच्या संगणक प्रणालीवर असल्याची खात्री करावी.
  7. अपघात असल्यास, FIR किंवा MLC असणे आवश्यक आहे.
  8. अवयव प्रत्यारोपण असल्यास रुग्णालयाचे मान्यता प्रमाणपत्र अथवा ZTCC येथे नोंदणी केल्याची पावती जोडणे आवश्यक आहे.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी फॉर्म 

 –Download —

वरील पैकी सर्व कागदपत्रांची पूर्तता करून कृपया आपला अर्ज  aao.cmrf-mh@gov.in या इमेलवर पाठवावे.

वैद्यकीय मदतीचा फॉर्म भरण्या संदर्भातील कोणत्याही प्रश्नासाठी मदत कक्षाच्या खालील क्रमांकावर संपर्क करावे.

02222025540 / 02222026948

mahacmmrf.com © 2022 All rights reserved

Design By ORNET Technologies Pvt. Ltd.

Skip to content